मारहाण करून लुटमार करणार्‍या तिघांना अटक

भुसावळ प्रतिनिधी । इंदूर येथील इसमास मारहाण करून त्याच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन लांबविणार्‍या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, काल दि. २१ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शहरातील नाहाटा कॉलेजच्या पुढे असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गाडीत डीझल भरण्यासाठी जात असतांना चहा पिण्यासाठी पेट्रोल पंपासमोर असलेल्या रिक्षा स्टॉप जवळ फिर्यादी नामे मेहेरबान सिंग जयसिंग नायक (वय-४० रा.शिरपुर तलाव धार रोड इंदौर ( मध्य प्रदेश ) हे थांबले होते. यावेळी अनोळखी अंदाजे १८ ते २० वयोगटातील मुलांनी फिर्यादीस शिवीगाळ करत त्यास धमकावुन गल्ली बोळात घेवुन गेले. तेथे त्यांनी मारहाण करून खिशातुन १०,०००/- रु रोख व मोबाईल जबरी चोरुन हिसकावुन घेतला. या संदर्भात फिर्यादी यांच्या फिर्यादी नुसार भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग ५ गु.र.न ७९३/२०२० भा.द.वी क.३९४,३२३,५०४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तेव्हा या गुन्हयातील संशयीत आरोपी भुसावळ शहरात जामनेर रोड हेवन होटेल च्या मागे शाह गल्ली येथे आले असल्याची गुप्त माहीती पो निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्याने त्यांनी पथक पाठविले. यात स.पो.नि.अनिल मोरे, सहा.फौ.सुनिल सोनवणे, पो.ना रविंद्र बिर्‍हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर,महेश चौधरी, पो.कॉ कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, गजानन वाघ यांच्या पथकाने या तिघांना अटक केली.

ही कारवाई पो.अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके, पो.उप्प.वि.पो.अधिकारी गजानन राठोड व निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या गुन्हयाचा तपास सहा.फौ.सुनिल सोनवणे करीत आहे.

Protected Content