रिक्षा अपघातात मुलगा गंभीर जखमी

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथून उमाळे येथे रिक्षाने प्रवास करत असताना रिक्षाचे चाक अचानक निघल्याने झालेल्या अपघातात १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रिक्षावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, माधुरी योगेश वाघ (वय-३२) रा. शंकर आप्पा नगर, पिंप्राळा, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या माहेरी उमाळे येथे जाण्यासाठी माधुरी वाघ आणि त्यांचा १२ वर्षाचा मुलगा दर्शन योगेश वाघ हे रिक्षाने १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ८१९८) ने प्रवास करत होते. दरम्यान जळगाव ते उमाळा गावच्या दरम्यान असलेल्या चिंचोली गावाजवळील वळणावर रिक्षातून जात असताना अचानक रिक्षाचे चाक निघाले. त्यामुळे झालेल्या अपघातात दर्शन योगेश वाघ (वय-१२) हा मुलगा खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रिक्षा चालक हा पोलीसात कोणती माहिती न देता रिक्षा घेऊन पसार झाला होता. उपचार घेतल्यानंतर महिलेने गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रिक्षावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफार तडवी करीत आहे.

Protected Content