पूर्णाड फाटा परिसरातील अवैद्य धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष!

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | तालुक्यातील पूर्णाड फाटा परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे बीट पोलिसांकडून दुर्लक्षित करण्यात येत आहे. यामुळे बीट हवालदार गप्प का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे.

तालुक्यातील पूर्णाड फाटा परिसरात अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. दरम्यान लाखो रुपयांची  उलाढाल होत असताना देखील पोलिस बीट हलदार गप्प असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बीट हवालदार गप्प का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. तत्पूर्वी परिसरात गावठी दारू, जुगार सर्रासपणे सुरू असल्याने याचा विपरीत परीणाम भावी पिढीवर होताना दिसून येत आहे. दरम्यान  पोलिस प्रशासनाकडून कुठलीही ठोस कारवाई केली जात नसल्याने सर्व स्तरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासून कुठलीही कारवाई होतांना दिसून येत नाही. यामुळे पोलिस कारवाई करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content