नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कच्च्या तेल्याच्या वाढत्या किमतीची कमान नवनिर्वाचित पेट्रोलियममंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हातात आहे. या पार्श्वभूमीवर हरदीपसिंह पुरी यांनी सौदी अरबचे ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा केलीय.
पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरीने तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेतील (ओपेक) प्रमुख देश सौदी अरबसोबत चर्चा करुन तेलाच्या विक्रमी किमतीबाबत भारतात व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेबाबत माहिती दिलीय. तेलाच्या विक्रमी किमतीमुळे इंधनाचे दर रेकॉर्ड स्तरावर पोहोचले आहेत.
पुरी यांनी एक दिवस आधीच संयुक्त अरब अमीरातीत ऊर्जामंत्र्यांसोबत चर्चा केली होती. यापूर्वी त्यांनी शनिवारी कतारच्या ऊर्जा मंत्र्यांसोबतही चर्चा केली होती. पुरी यांनी सौदी अरबचे ऊर्जामंत्री शहजादा अब्दुल अजीज बिन सलमान अल सऊद यांच्याशी चर्चा केली.
पुरी यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, ‘सौदी अरब आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात एक महत्वपूर्ण देश आहे. ‘मी जागतिक तेल बाजाराला भरोसेलायक तसंच हायड्रोकार्बनला अधिक किफायतशीर बनवण्यासाठी सुल्तार अब्दुल अजीज यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली’. पुरी यांनी सौदी मंत्र्यांशी आपली चर्चा मैत्रिपूर्ण झाल्याचं आणि सार्थकी लागण्याचं म्हटलंय. तसंच इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर लवकरच उपाय निघेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती कच्च्या तेल्याच्या किमतीवर आधारलेल्या असतात. आपल्याला कच्चे तेल कमी किमतीत मिळाले तर पेट्रोल-डिझेलच्या दरातही काही प्रमाणात मर्यादा ठेवली जाऊ शकते.