आगामी निवडणुकात भाजपाला शिवसेनेची ताकद दाखवा- विलास पारकर

रावेर प्रतिनिधी । आगामी स्वराज्य संस्थाच्या निवडणुकामध्ये शिवसेनेचे जास्तीत-जास्त उमेदवार निवडणून आणावे विश्वासघाती भाजपाला आपली ताकद दाखविण्याची ही योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी केले.

शहरात शिवसेनेचे रावेर विधानसभा क्षेत्राचे शिवसंपर्क अभियान राबविण्यासाठी बैठक संपन्न झाली. यावेळी विलास पारकर बोलत होते. 

पारकर पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या जास्तीत-जास्त योजना सर्व-साधारण जनतेपर्यंत पोहचविण्याचे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना दिले. यावेळी प्रहारमध्ये गेलेले शिवसैनिक प्रविण चौधरी यांची सेनेत घरवापसी झाली. यावेळी बैठकीला लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर, विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मसूरकर, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे,  यावल बाजार समिती सभपती मुन्ना पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, शिवसेना तालुका प्रमुख योगराज पाटील, शिवसेना उपजिल्हा संघटक रविंद्र पवार, युवासेना शहरप्रमुख राकेश घोरपडे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रविण पंडित, शिवसेना शहरप्रमुख नितिन महाजन, उपप्रमुख राम शिंदे, जयेश पाटील, गणेश महाजन, भैय्या पाटील, उमेश वरणकर, आकाश चौधरी, संतोष महाजन, योगेश धनके, महिला शहर संघटक बबली महाजन, दक्षता समती सदस्य कल्पना महाजन, कुणाल बागरे आदी शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचलन अशोक शिंदे यांनी केले

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!