मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आमदार अपात्रता प्रकरणात आज सुप्रीम कोर्टाने नोंदविलेली निरिक्षणे पाहता उध्दव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकता असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टात आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर एकत्रीत सुनावणी घेण्यात आली. यात सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला नसून यावर १ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणीचे निर्देश दिले आहेत. मात्र आजच्या सुनावणीत अनेक महत्वाच्या टिपण्ण्या केल्या असून यामुळे शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. याच प्रकरणी आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, अद्याप या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला नाही. मात्र आज शिवसेनेच्या वकिलांनी अतिशय प्रभावी युक्तीवाद केला. त्यांचा युक्तीवाद हा नियमांवर आधारित होता, तर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने कॉमन सेन्सवर बोलण्यात आले. यामुळे या प्रकरणी आता काय निकाल लागेल ते तर समोर येईलच, पण उध्दव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.