पुणे येथे तीन दिवसीय उजळणी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन-युनिसेफ आणि मिऱ्याकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाल कल्याण समिती अध्यक्ष व सदस्य यांच्यासाठी तीन दिवसीय निवासी पुर्णवेळ उजळणी प्रशिक्षण कार्यशाळा २१ डिसेंबर ते २३ डिसेंबर पर्यंत या कालावधीत यशस्वीरित्या संपन्न झाली. या प्रशिक्षण कार्यशाळेत संदीप पाटील यांनी आपल्या अनुभव व कार्यनुभवाने लक्ष वेधले.

पुणे येथील अरोरा टावरच्या सभागृहात संपन्न झालेल्या तिन दिवसीय या प्रशिक्षण कार्यशाळेत In the best interest of a child यासाठी बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व बालकांशी संबधित इतर ७ कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर सयुक्तिक व्हावा, म्हणून कायद्यातील सर्व तांत्रिक बाबी ,कलम व तरतुदी त्यांचे अभिप्रेत असलेले अनव्यार्थ, आपलं योग्य कार्यक्षेत्र, ठायी असावी लागणारी संवेदनशीलता, प्रामाणिकपणा व कर्तव्य तत्परता, आकलनशक्ती तसेच सहाय्यभूत असलेल्या सर्व शासकीय व सेवाभावी यंत्रणांचा सुयोग्य वापर व त्यांच्या मर्यादा व यासर्व यंत्रणा सोबतचा समन्वय आणि समय सुचकता या सर्व बाबींचा सुयोग्य वापर करण्यासाठी हे उजळणी प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित केली गेली ज्यातून बाल कल्याण समिती (न्यायपीठ) च्या कार्यक्षमता वृद्धिंगत करता येतील.

तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी संबधित क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ मागर्दशक लाभले होते त्यांचे विशेष आभार पाटील यांनी मानले व त्याचबरोबर ज्यांनी हे सर्व उपलब्ध करून दिले असा आमचा महिला व बाल विकास आयुक्तालयातील संबधित अधिकारी व सहकारी तसेच युनिसेफ व मिऱ्याकल फौंडेशन व त्यांचा सहकार्यांंचे त्यांनी यावेळी मनपूर्वक आभार मानले.

 

Protected Content