कुंभारखेडा येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य वैशाली ताठे यांचा सत्कार

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील कुंभारखेडा ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी वैशाली विलास ताठे यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी कुंभारखेडावासियांचे आभार मानले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  कुंभारखेडा ग्रामपंचायत स्थापनेपासून आजपर्यंत ताठे परिवारातील एकमेव वैशाली विलास ताठे ह्या पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्य म्हणून विराजमान झाल्या आहेत. म्हणजे ताठे परिवारातील सदस्यांपैकी सर्व प्रथम ग्रामपंचायत सदस्य होण्याचा बहुमान वैशाली ताठे यांना मिळाला. समस्त ताठे परिवारासह समस्त कुंभारखेडा गावकऱ्यांचे भरभरून आशीर्वाद त्यांना मिळाले. तर  त्या रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे यांच्या सौभाग्यवती असून वैशाली ताठे यांनी ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या की, कुंभारखेडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या सहकार्याने, विलास ताठे यांच्या मदतीने व समस्त कुंभारखेडा गावकऱ्यांच्या साक्षीने सेवाकार्या अखंडपणे सुरू करण्याचा वसा मी घेतला आहे. तर त्यांनी समस्त कुंभारखेडावासीयांचे  आभार मानले.तसेच  वैशाली ताठे यांना सुध्दा समस्त कुंभारखेडा गांवकरी मंडळी व आप्तेष्टांनी यांनी अभिनंदन करुन भरभरून कौतुक केले.

Protected Content