पुणे, वृत्तसेवा । पुणे शहर रविवारी भारतातील कोरोनाच्या संसर्गाची राजधानी बनलं. देशात सर्वाधिक रुग्णांची पुणे शहरात नोंद होत असल्याने हे शहर मुंबईला मागे टाकत देशातील नवं ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनलं आहे.
करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत महाराष्ट्राने दक्षिण अफ्रिकेलाही मागे टाकले असून या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५,९५,८६५ इतकी आहे. जागतीक आकडेवारीनुसार, दक्षिण अफ्रिकेचा पाचवा क्रमांक लागतो. याबाबत अमेरिका (५५,६६,६३२), ब्राझिल (३३,४०,१९७), भारत (२६,४७,३१६) आणि रशिया (९,२२,८५३) हे देश दक्षिण अफ्रिकेच्या पुढे आहेत. मुंबई शहर अद्यापही कोरोनाबाधितांच्या मृत्यू प्रमाणात आघाडीवर आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांची संख्या २०,०३७ एवढी झाली आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत राज्यात ५,९५,८६५ इतके बाधित लोक आहेत. महाराष्ट्राचं बरं होण्याचं प्रमाण हे ६९.८२ टक्के आहे. तर मृत्यूप्रमाण हे ३.३६ इतके आहे.