पीडितेच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

पारोळा प्रतिनिधी l तालुक्यातील टोळी येथील मयत पीडित तरुणीच्या कुटुंबाची आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्यांनी प्रशासनाला या प्रकरणी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत

याबाबत वृत्त असे की, टोळी येथील तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला विष पाजून मारण्याचा भयंकर प्रकार नुकताच घडला आहे. पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी आज या तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत आमदार चिमणराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास विसावे, प्रांताधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रकरणाची जलदगतीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश या प्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

Protected Content