पिस्तूलाचा धाक दाखवून लूट करणाऱ्या दोन दरोडेखोरांना अटक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल-भुसावळ रस्त्यावर एका तरूणाला अज्ञात चार दरोडेखोरांना पिस्तूलाचा धाक दाखवून दुचाकीसह हातातील मोबाईल जबरी हिसकावून लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलीसांना यश आले आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अजय मोरे हा तरूण भुसावळकडून यावलकडे दुचाकीने रात्री १० वाजेच्या सुमारास येत होता. अंजाळे घाटातून दुचाकीने जात असतांना अज्ञात चार दरोडेखोरांनी अजयचा रस्ता आडविला. पिस्तूलाचा धाक दाखवून त्याच्याजवळील मोबाईल आणि त्याची दुचाकी घेवून पसार झाले होते. हा प्रकार घडल्यानंतर अजयने यावल पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान व त्यांचे पोलीस पथक घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. पोलीसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून रस्ता लुट प्रकरणातील दोन दरोडेखोरांना यावल शिवारातून अटक करण्यात यश आहे. करण रमेश पवार आणि विक्की अंकुश साळवे दोन्ही रा. आसोदा ता.जि.जळगाव असे अटक केलेल्या दोन्ही दरोडेखोरांची नावे आहे. तर त्यांचे दोन साथीदार फरार झाले असून त्यांचाही शोध सुरू आहे.

 

यावल भुसावळ हा मार्ग वाहतुकीचा असुन रात्रीच्या वेळेस देखील मोठया प्रमाणावर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी नागरीकांची नेहमीच वर्दळ या मार्गावर असते. या ठीकाणी अंजाळे घाटावर मागील अनेक वर्षापासून पोलीस चौकी बांधण्यात आली. परंतू त्याचा काहीही उपयोग होत नाही. पोलीस चौकीत पोलीसांची गस्त वाढवावी  अशी मागणी केली जात आहे.

Protected Content