पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिक विमा व अतिवृष्टी अनुदान लवकरात लवकर मिळावे अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेने खासदार उन्मेष पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, पिक विमा व अतिवृष्टीबाबत शासनाची उदासीनता खरीप हंगामात या वर्षी शेतकऱ्यांना अस्मानी संकटाने घेरले होते. शेतकऱ्यांनी खरीप २०२१-२२ चा पंतप्रधान पिक विमा योजनेतून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा संरक्षक पिक कवच म्हणून विमा घेतलेला होता. परंतु, आजपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांची हेळसांड होताना दिसत आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. पिक विमा व अतिवृष्टी अनुदान लवकरात लवकर मिळावे अशी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप हंगामात न भुतो न भविष्यती असा पाऊस झाल्याने पावसाने सरासरी ओलांडली. शेतकऱ्यांचे पीक नुकसानीस पात्र ठरले. पारोळा तालुक्यातील पाच महसूल मंडळापैकी पारोळा, चोरवड या मंडळांना अतिवृष्टी अनुदान मिळाले व उर्वरित बहादरपूर, शेळावे, तामसवाडी या मंडळातील शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले आहे. निवेदन देतांना शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील जोगलखेडे, कार्याध्यक्ष पतंगराव पाटील रत्नापिंप्री, उपाध्यक्ष दत्तू पाटील मंगरूळ, मार्गदर्शक अरविंद बोरसे बहादरपूर, रामकृष्ण पाटील रत्नापिंप्री, मुरलीधर पाटील रत्नापिंप्री, भाऊराव पाटील हिवरखेडे, संजय पाटील कराडी, रामदास पाटील मंगरूळ, विनोद पाटील पळासखेडे, धुडकु पाटील मुंदाने, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.