ज्याची भिती होती तोच निर्णय दिला ! : शरद पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेची धनुष्यबाण निशाणी गोठविल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेनेचीच चर्चा सुरू आहे. काल रात्री केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरण्यास देखील मज्जाव केला आहे. ठाकरे आणि शिंदे यांनी आपल्या पक्षाचे नाव आणि चिन्हे यांचे प्रत्येकी तीन पर्याय सादर करण्यासाठी सोमवारी दुपार पर्यंतची मुदत देखील देण्यात आलेली आहे.

दरम्यान, यावर आज शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाष्य केले आहे. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने जी भीती होती तोच निर्णय दिला आहे. तथापि, यामुळे शिवसेना संपणार नसून अजून जोमाने वाढणार आहे. तर महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. केंद्रातील सत्ताधारी हा आपल्या सत्तेचा गैरवापर करत असल्याची टीका देखील शरद पवार यांनी याप्रसंगी केली.

Protected Content