जळगाव प्रतिनिधी । पान टपरीवर बसलेल्या एका तरूणाला चौघांनी बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, मनोज रमेश भालेराव (वय-२४) रा. पिंप्राळा ता.जि.जळगाव हा तरूण सनशाईन हॉटेलजवळील पान टपरीवर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एकटा बसला होता. त्यावेळी दिपक भोई आणि राजू शिंपी दोघे रा. खंडेराव नगर यांनी काय आहे रे त्यावर मनोज म्हणाला की गाणे ऐकतोय असे म्हणाला त्यावर काय गाणे ऐकतोय रे असे सांगून सावखेडा कडे जाणाऱ्या रोडजवळ असलेल्या एका पटांगणात बोलावून दिपक भोई यांने हातातील लाकडी दांडक्याने मनोजच्या डोक्याला मारहाण केली तर राजू शिंपी यांच्यासह इतर दोन जणांनी तोंडावर हातपायावर, पोटावर मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच शिवीगाळ करून कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली. मनोज भालेराव यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.