जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| पिंप्राळा परिसरातील सोनीनगरातून २२ वर्षीय तरुण घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता ठरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,
दर्शन नरेश चौधरी (वय-२२) रा. सोनी नगर, पिंप्राळा हा तरुण आपल्या आई-वडिलांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता बाहेरून फिरून येतो असे सांगून घरातून निघाला. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याचा भाऊ पवन याने त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु दर्शन हा कुठेही मिळून न आल्याने अखेर शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली. त्याच्या खबरीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.