पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील भोजे येथील रेशन दुकानावर गोंधळ घालत दुकानदारांविरोधात खोट्या तक्रारी करणे, शिवीगाळ, गर्दी जमविणे, समुहास चितावणी देणे आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी तरूणावर पिंपळगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील भोजे येथील रेशनदुकानदारांना खोट्या तक्रारी करणे, शिवीगाळ करणे, ब्लॅकमेल करणे, बदनामी करणे, शासकीय कार्यालयात खोटे मेल पाठविणे, अधिकाऱ्यांना व्हॉटस्ॲप नंबरवर कारवाईचे मॅसेच पाठविणे, लॉकडाऊन काळात गर्दी जमवणे, समुहास चिथावणी देणे या कारणावरून निलेश नामदेव उबाळे याच्याविरूध्द पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. या कामी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.