पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी)। येथील स.न.झवर विद्यालयात पाळधी पत्रकार संघ व झवर विद्यालय शिक्षक यांच्यावतीने स्वर्गीय शरद कुमार बन्सी यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार व झवर विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष सुनील झवर यांनी शोकसभा घेतली. तसेच स्व. शरद बन्सी यांच्या सामाजिक कार्य व जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. यावेळी पाळधी पत्रकार संघाचे पत्रकार बंधु भगवान मराठे, महेश बाबा झवर, विलास झवर, दीपक झवर, अलीम देशमुख, गोपालभाऊ सोनवणे, उमेश झवर, अरविंद मानकरी यांच्यासह पत्रकार बांधव तसेच स.न. झवर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा तोतला व न्यू इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापिका कल्पना पाटील उपस्थित होत्या. तसेच झवर विद्यालयाचे उपशिक्षक विवेक भदाणे यांनी स्वर्गीय बन्सी सरांच्या आपल्या विद्यार्थीदशेतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. या वेळेस उपस्थित असलेले सर्व जणांनी सरांना श्रद्धांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री राठी मॅडम यांनी केले.