धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथील कोळीवाडा भागातून एका तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल प्रकाश देशमुख (वय-२८) रा. अष्टभुजा मंदीराजवळ, दादावाडी हे खासगी कामाच्या निमित्ताने पाळधी येथे जातात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीसी ७१) क्रमांकाची दुचाकी आहे. कामासाठी या दुचाकीचा वापर करतात. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते कामाच्या निमित्ताने पाळधी येथे दुचाकीने गेले होते. पाळधी गावातील कोळीवाडा येथून अज्ञात भामट्यांनी २० हजार रूपये किंमतीची होन्डा शाईन दुचाकी लांबविली. परिसरात शोधुन दुचाकी मिळाली नाही म्हणून राहुल देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण सपकाळे करीत आहे.