*पाचोरा, प्रतिनिधी* | तालुक्यातील पाळधी हद्दीतील महामार्ग पोलिसांकडून अपघात ग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी म्हणून स्ट्रेचर व प्रथमोपचार पेटीचे वाटप करण्यात येत आहेत. यावेळी प्रथम राहुल महाजन यांना देण्यात आले.
तालुक्यातील पाळधी महामार्ग पोलीस केंद्राच्या हद्दीत मृत्युंजय दुत योजना या महत्वाच्या संकल्पनेतुन महामार्गावर होणाऱ्या अपघातात लोकांचे प्राण वाचविण्यासाठी व त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून मृत्युंजय दूत योजना सन – २०२१ मध्ये सुरू करण्यात आली होती. यात पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) तसेच जवळपास महामार्गावर होणाऱ्या अपघातात जखमी व्यक्तींना मदत कार्य करणारे मृत्युंजय दूत म्हणुन काम करणारे हाॅटेल जय मल्हार चे संचालक राहुल महाजन व त्यांच्या बरोबर जे मदत करतात त्या सर्व ग्रुप मेंबर यांना १ स्ट्रेचर, १ फस्ट एड किट बॉक्स (प्रथमोपचार पेटी) वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल मेढे, सहायक पोलिस निरीक्षक किरण बर्गे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, पोलीस नाईक प्रदीप नन्नवरे, हेमंत महाडीक, चालक पोलिस नाईक कपिल चौधरी आदी उपस्थित होते.
हायवे मृत्युंजय दूत संकल्पना जैन इरीगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अतुल जैन, कंपनीचे चंद्रकांत नाईक यांना सांगितल्यानंतर त्यांनी मृत्युंजय दुत यांना स्ट्रेचर आणि फस्ट एड किट बॉक्स (प्रथमोपचार पेटी) साहित्य उपलब्ध करून दिल्याने त्यांचे या कार्यकरिता अनमोल सहकार्य लाभले.
महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी हद्दीत मृत्युंजय दूत यांना राष्ट्रीय व राज्य महामार्गवर अपघात कमी होण्याकरिता सक्रिय कार्य करणेबाबत यावेळी प्रोत्साहित करण्यात आले तसेच यापुढे मृत्युंजय दुत म्हणून मदत करण्यास तयार असलेल्या व्यक्तींना यात सहभागी करून घेण्यात येणार असून त्यांच्यापर्यंत असे साहित्य देऊन अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत मिळावी याकरिता महामार्ग पोलीस प्रयत्नशील राहणार आहे.
सदर कार्यक्रमाला उपस्थित सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे, महाराष्ट्र पोलिस केंद्र पाळधी (जि. जळगाव) पी. एस. आय. राजेंद्र सोनवणे, हेडकॉन्स्टेबल किरण हिवराळे, अनिल सपकाळे, भारत काळे, दिपक पाटील, खेडगाव (नंदीचे) ता. पाचोरा येथील विजय ढमाले, किरण राजपूत, बंडू ढमाले, प्रेमराज बोरसे, भूषण वानखेडे, दिपक गोंड, विशाल ढमाले उपस्थित होते.