पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

यावल, प्रतिनिधी | येथील यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा शनिवार दि.२३ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार

 

यावल पंचायत समितीच्या नुतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे याकरीता पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजीत चौधरी व उपसभापती योगेश भंगाळे यांनी व पंचायत समितीच्या सदस्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निमंत्रण दिले. पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमाचे निमंत्रित स्विकारले असल्याची माहिती सभापती पल्लवी चौधरी व उपसभापती योगेश भंगाळे यांनी दिली. या लोकापर्णसोहळ्यास यावल रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी , यावल चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई सोनवणे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावल पंचायत समितीचे शासकिय कामकाज हे मागील अनेक वर्षापासुन अत्यंत जिर्ण झालेल्या जुन्या इमारतीत सुरू आहे. संपुर्ण राज्यात होवु घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहिता लागण्यापुर्वीच हा पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकापर्ण सोहळ्याचा कार्यक्रम करून घ्यावे लागणार आहे. दरम्यान, यावल पंचायत समितीची नुतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी  माजी आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांच्यासह आमदार शिरीष चौधरी यांनी शासनाकडे सातत्याने प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तथा तत्कालीन मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांच्याकडून इमारतीच्या उभारणीस निधी उपलब्ध करून भुसावळ येथील प्रमोद नेमाडे यांनी तात्काळ कमी वेळेत या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीस वेगाने व चांगले कार्य केले.

Protected Content