जळगाव येथील तरूणीवर अत्याचार; एकावर गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । जळगाव शहरातील २१ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी यावल तालुक्यातील पिळोदा येथील तरूणावर आज यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी २१ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. तिचे यावल तालुक्यातील पिळोदे येथील गजानन भगवान पाटील या तरूणाशी ओळख निर्माण झाली. ओळखीनंतर दोघांचे मैत्रीचे संबंध निर्माण झाले. ओळखी निर्माण झाल्यानंतर २१ वर्षीय तरूणीला गजानन पिळोदे येथे घरी घेवून गेला. त्यानंतर तरूणीशी बळजबरी लग्न करून तिच्यावर अत्याचार केला.  दरम्यान याप्रकरणी पिडीत तरूणीने यावल पोलीसात तरूणाविरोधात तक्रार दिली. तरूणीच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गजानन पाटील याच्या विरोधात यावल पोलीसात आज १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे.

Protected Content