पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते माँ भगवती महिला बचत गटाच्या विक्री केंद्राचे उदघाटन

 

भुसावळ, प्रतिनिधी । महिला विकास महामंडळ जळगाव व स्वप्नपूर्ती लोक संचलीत साधन केंद्र जळगाव अंतर्गत स्थापित माँ भगवती महिला बचत गटाच्या फरसाण विक्रीचे उदघाटन आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 फरसाण तयार करणे व विक्री व्यवसायाला महिला विकास महामंडळ अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी भेट देऊन कौतुक केले होते. या भेटीत त्यांनी माँ भगवती महिला बचत गटाच्या पॅकिंग व लेबलीग अजून दर्जेदार करणेबाबत सूचीत केले होते. त्यानुसार आज त्यांनी तयार केलेले फरसाणचे ६ प्रकार त्यात चिवडा, मसाला शेव, पापडी गोडशेव, तिखट बुंदी, फिके शेव, ह्याना दर्जेदार पॅकिंग व लेबलीग करण्यात आली आहे. आज पासून त्याची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उदघाटन करून विक्रीला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा समन्वय अधिकारी शेख अतिक, महिला विकास महामंडळ जळगाव सहयोगी नीलता वाडेले, संजु माळी व बचत गटांतील सर्व महिला उपस्थित होत्या.

Protected Content