पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवार दि. १२ जून रोजी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

 

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस अनेक समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला त्याच अनुषंगाने शिवसेना जळगाव महानगरतर्फे उप महानगर प्रमुख प्रशांत सुराळकर यांच्या संकल्पनेतून ७०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांनी कौतुक केले. समाजातील गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशांत सुरळकर यांच्या माध्यमातून नेहमी केला जातो याचा मनस्वी आनंद असल्याचे ना पाटील म्हणाले.
याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, सामाजिक कार्यकर्ते सुभाष सांखला, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी नगरसेवक शाम कोगटा, नगरसेवक नितीन बरडे, बंटी जोशी, मनोज चौधरी, शोभा चौधरी, निर्मला चौधरी, श्रीमती बेबाबाई सुरळकर, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जकीर पठाण, सुभाष चौधरी, जिलनी शेख आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी राजू पाटील, मुन्ना परदेशी, मुन्ना मराठे, भैय्या ठाकूर, अनिल चौधरी, योगेश पाटील, विशाल पाटील, कल्पेश हळदे, आबा चौधरी, सतीश भावसार, ईश्वर सोनवणे, हरीश चौधरी, अनिल कोळी, चेतन मराठे, हीतेश शिंपी, पवन शिंपी, रवींद्र चौधरी, उमेश चौधरी, रामचंद्र चौधरी, राजू चौधरी आदींनी प्रयत्न केले. नवसंजीवनी समाज विकास संस्था व तरुण कुढापा मंडळ याचे अनमोल सहकार्य लाभले सूत्रसंचालन आयाज मोहसीन यांनी तर आभार शैलेश सुरळकर यांनी मानले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/329799642505486

 

Protected Content