पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांचे आदिशक्ती सप्तश्रुंगीला साकडे !

नाशिक प्रतिनिधी | कोरोनाचे सावट दूर करतांनाच शेतकर्‍यांसह सर्वांना सुख-समृध्दी प्रदान करावी अशी प्रार्थना करत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील वणी येथील आदिशक्ती सप्तश्रुंगीला साकडे घातले. ना. पाटील यांनी आज पहाटे देवीदर्शन करून प्रार्थना केली.

 

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे नित्यनेमाने वणी येथील गडावर दर्शनासाठी जात असतात. घटस्थापनेच्या पहिल्या माळेला राज्यातील देवस्थाने खुली झाल्यानंतर आज पहाटे ना. गुलाबराव पाटील यांनी वणी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला असून देवीमातेने हे सावट दूर करावे, अतिवृष्टीने यंदा झालेल्या हानी पुन्हा होऊ नये आणि सर्वांना सुख-समाधान लाभावे आणि समृध्दी मिळावी असे साकडे आपण सप्तश्रुंगी देवीला घातल्याची माहिती ना. पाटील यांनी याप्रसंगी दिली. दरम्यान, याप्रसंगी वणी येथील श्री सप्तश्रुंगी देवी देवस्थान विश्‍वस्तांच्या वतीने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Protected Content