पारोळा प्रतिनिधी । शहरातील चोरवड रोडवरील बालाजी नगरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ८० हजार रूपयांसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सतिश नानाभाऊ पाटील (वय-३८) रा. न्यु बालाजी नगर, चोरवड रोड पारोळा हे कामानिमित्त नातेवाईकांसह १६ फेब्रुवारी रोजी बाहेरगावी घर बंद करून गेले. घर बंद असल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा कापूर घरातील ८० हजार रूपये रोख आणि सोन्याचांदीचे दागिने लंपास केला. सतिश पाटील हे १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घरी आले तेव्हा घराचा दरवाजाचा कडीकोयंडा कापलेल्या अवस्थेत दिसून आला. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून पोलीसांना महिती दिली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार बापुराव पाटील करीत आहे.