पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील तामसवाडी गणाच्या पं.स.सदस्या सुजाता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील गरजूंना संसारोपयोगी वस्तू व किरणाचे घरपोच वाटप केले. त्याच्या स्तुत्य कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्या मातोश्री तथा तामसवाडी गणाच्या पं.स. सदस्या सुजाता बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिम्मित अंध, अपंग, विधवा कुटुंबांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सुजाता पाटील यांचा वाढदिवस घरगुती पद्धतीने साजरा करून कोणताही वायफळ खर्च न करता शहरातील अनेक अंध, अपंग व विधवा महिलांना, कुटुंबांना घरपोच किराणा, भोजन आणि संसार उपयोगी साहित्य वाटप केले. नगराध्यक्ष करण पवार मित्र मंडळ सदस्य कैलास पाटील व त्यांच्या पथकाने झपाट् भवानी मंदिर परिसर, धोबी गल्ली आदी भागात सदर वाटप केले गेले. या अगोदर नगरसेविका अंजली करण पवार यांनी ही त्यांच्या प्रभाग 2 मधील राजीव गांधी भागात तांदूळ वाटप केला होता.