पाचोरा : प्रतिनिधी ! टोळी येथील चर्मकार समाजाच्या विद्यार्थिनींवर तीन नराधमांनी पाशवी बलात्कार करून विष पाजून खुन केल्याच्या गुन्ह्याचा पाचोरा येथे चर्मकार उठाव संघ व अखिल भारतीय वाल्मीकी महापंचायत शाखेच्या वतीने निषेध करण्यात आला.
यावेळी आरोपी शिवनंदन पवार, पप्पू पाटील, अशोक पाटील व अज्ञात महिले विरूध्द अनुसूचीत जाती जमाती प्रतीबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा आशयाचे निवेदन तहसीलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. त्यांच्या वतीने निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनावर चर्मकार उठाव संघाचे तालुकाध्यक्ष नितीन तायडे, सचिव दिलीप अहिरे, गंगाराम तेली, राजू सावंत, वंसत वाघ, प्रकाश नाथेकर, वाल्मीक अहिरे, अखिल भारतीय वाल्मीकी समाज महापंचायत अध्यक्ष वाल्मिक पवार, आकाश चव्हाण, किरण महाले, पप्पू अहिरे, रमेश चव्हाण गणेश अहिरे, बबलू लिंगायत, संदीप गाडेकर व चर्मकार बांधव हजर होते.