पारोळा मतदारसंघात विकास कामांसाठी २३.४६ कोटींची निधी मंजूर

 

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने पारोळा मतदारसंघातील तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालयासह रस्त्यांचा सुधारणेसाठी २३.४६ कोटी रूपयांचा कामांना मंजुरी मिळाली आहे.

पारोळा मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासुन प्रचंड खराब असलेल्या रस्त्यांमुळे रहदारी करणाऱ्या नागरीकांसह स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्यांचा झालेल्या दुरावस्थेमुळे शिक्षण, आरोग्य, दळणवळण यांसारख्या समस्यांना दैनंदिन नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. यासोबतच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालये नसल्याने किंवा ज्या गावात कार्यालये आहेत त्या गावातील कार्यालये जिर्ण झालेली असल्याने तलाठी व अधिकाऱ्यांना नागरीकांना सेवा देण्यास मोठी अडचण उद्भवत होती. यामुळे नागरीकांची देखील मोठी गैरसोय होतांना दिसत होती.

आमदार पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा पुरावा करित होते. या पाठपुराव्यानेच सद्या नागपुर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी अर्थसंकल्प २०२२ अंतर्गत एकुण २३.४६ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी यांना आपले कर्तव्य बजावण्यास सोयीचे होणार असुन रस्त्यांचा दुरावस्थेमुळे उद्भवणाऱ्या दैनंदिन समस्यांना पुर्णविराम लागणार आहे.

२३.४६ कोटींच्या मंजुर कामांत पारोळा तालुक्यातील ३१ तलाठी कार्यालय व ४ मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीचे बांधकाम करणेसाठी – ८.४६ कोटी, भडगांव तालुक्यातील ५ तलाठी कार्यालय व १ मंडळ अधिकारी कार्यालय इमारतीचे बांधकाम करणेसाठी – २.५० कोटी, भडगांव तालुक्यातील पिंपरखेड ते अंजनविहिरे रस्ता रूंदीकरणासह सुधारणेसाठी – २.५० कोटी, भडगांव तालुक्यातील अंजनविहिरे ते गिरड रस्ता रूंदीकरणासह सुधारणेसाठी – २.५० कोटी, भडगांव तालुक्यातील गिरड ते पिंपळगांव रस्ता सुधारणेसाठी – २.५० कोटी, पारोळा तालुक्यातील बोळे ते मोंढाळे रस्ता पाईप मोऱ्यांसह सुधारणेसाठी – २.५० कोटी, पारोळा तालुक्यातील नगांव ते लोणी रस्ता रूंदीकरणासह सुधारणेसाठी – २.५० कोटी या कामांचा समावेश आहे.

Protected Content