पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहराच्या बाजूने गेलेला बायपास राष्ट्रीय महामार्गाच्या विकास कामांमध्ये या महामार्गाच्या लगतच्या ५२ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांचे शासनाकडे मोबदल्याचे ७७ कोटी प्रलंबित आहेत. हा मोबदला महिन्याभरात अदा करण्याबाबतच्या सूचना खा. उन्मेश पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी खासदारांचे आभार मानले आहेत.
पारोळा येथील शहराबाहेरून जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील कब्रस्तानकडे जाणारा अंडरपास, वंजारी मार्गावरील अंडरपास, पूनगाव रस्त्याचा प्रश्न. तसेच यासह राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत उद्भवलेल्या समस्येसाठी खा. उन्मेश पाटील यांनी न्हाईचे प्रकल्प संचालक व संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळावर पाहणी करत सर्व विषयांना मार्गी लावल्याने खासदारांच्या भूमिकेचे जिल्हाभरातून स्वागत केले जात आहे.
शुक्रवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पारोळा शहरा बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या विविध समस्यांची खासदार उन्मेश पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह मान्यवरांनी पाहणी केली.
यावेळी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, नगरसेवक प्रवीण शेठ बडगुजर,नगरसेवक पी.जी. पाटील, नगरसेवक भैया चौधरी, अनिल पाटील, गौरव बडगुजर, संजय पाटील, डॉ. कुरेशी, सलीम सदर, हमीद टेलर, इमरान शेख, डॉ. आसिफ कुरेशी, दिलावर पठाण, अली मिस्तरी, मोहम्मद पठाण, मोहम्मद खान, नारायण पाटील, अरुण सोनार, दादाभाऊ पाटील, सुनील राघो पाटील, आप्पा महाजन, अरुण पाटील, ईश्वर पाटील, सचिन पाटील प्रकाश पाटील, प्रकाश देवराम पाटील, संजय पाटील, पितांबरआप्पा पाटील, दादाभाऊ पाटील, बापू पाटील, शुभम पाटील, कैलास पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवर शेतकरी बांधव उपस्थित होते.
वंजारी मार्ग, कब्रस्तान अंडरपास कामासं प्रारंभ
राष्ट्रीय महामार्ग झाल्याने वंजारी मार्ग व कब्रस्तानकडे जाणाऱ्या रस्ता बंद होणार असल्याने नागरिकांनी नगराध्यक्ष करण पवार यांचे माध्यमातून खा. उन्मेश यांचेकडे या अंडरपासबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
खासदार उन्मेश पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. के. सिन्हा यांना जागेवरच अंडरपास मंजूर करून उद्याचे उद्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले. दोन्ही अंडरपासच्या कामांना उद्याच प्रत्यक्षात सुरुवात केली जाईल असा प्रकल्प संचालक एस. के. सिन्हा यांनी नागरिकांना विश्वास दिला. तर नगराध्यक्ष करण पवार यांनी नागरीकांच्या वतीने प्रशासनाचे आभार मानले.
मोबदल्याबाबत महिनाभरात निर्णय घ्या खासदारांची तंबी
हायवे बाधीत ५५ शेतकऱ्यांनी आजवर अनेकदा नॅशनल हायवे, प्रांताधिकारी, तहसीलदार व विविध यंत्रणांकडे पाठपुरावा केला. त्यांचा पाठपुरावा चूक की बरोबर या विषयावर प्रशासनाने लक्ष न घालता शेतकऱ्यांनी एक पाऊल मागे टाकत प्रशासनाशी जुळून घेत, प्रशासनाने देखील येत्या महिनाभरामध्ये कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे ७७ कोटी रुपये देण्यासंदर्भामध्ये तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देत यांच्याशी या विषयावर तातडीने लक्ष देऊन काम करण्याच्या सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्या.
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
येथील ५५ शेतकऱ्यांनी आजवर केलेल्या संघर्षाची कहाणी खासदार उन्मेश यांच्या समोर मांडली. दादा आम्हाला चुकीच्या पद्धतीने सल्ला मिळत गेला. आम्ही त्या पद्धतीने भावनेच्या भरामध्ये पाठपुरावा करत गेलो. मात्र आपण आज लक्ष घातल्याने आम्हाला मोबदला मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे. या मोबदल्याच्या बळावर आम्ही अनेक व्यवहार केले,काही शेतकऱ्यांचे निधन झाले तर अनेक शेतकऱ्यांना यामुळे मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आम्ही आपले आजच्या निर्णयामुळे आभारी असून असे सांगत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
नगराध्यक्ष करण पवार यांनी शेतकऱ्यांना धीर देत खासदार उन्मेश पाटील यांनी या विषयावर शंभर टक्के लक्ष घालण्याची आपल्याला आश्वासित केल्याने आपण निश्चित रहावे असा विश्वास दिला.