पारोळा प्रतिनिधी । कुटीर रूग्णालय येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते कोरोना प्रतिबंधक ‘कोविशील्ड’ लसिकरणाचे व लसीकरण कक्षाचे उदघाटन करण्यात आले. प्रतिबंधक ‘कोविशील्ड’ लस तालुक्यात प्रथम कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंखे यांनी देण्यात आली.
‘कोविशील्ड’ लसिकरण प्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, पारोळा शिवसेना शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, जि.प. सदस्य रोहन पाटील, पं.स. उपसभापती अशोक पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रांजली पाटील, डॉ. गिरीष जोशी, पंकज मराठे, राजु पाटील, छोटु चौधरी तसेच व कुटीर रूग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.