यावल आणि रावेरच्या रिक्षाचालकांची मोफत ऑनलाईन नावनोंदणी : डॉ . कुंदन फेगडे

यावल,  प्रतिनिधी ।  कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेला परवानाधारक रिक्षा चालकांना १५००/- रु. सानुग्रह अनुदान योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे.  या योजनेचा लाभ यावल व रावेर तालुक्यातील रिक्षाचालकांना मिळावा यासाठी नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी ऑनलाईन मोफत अर्ज भरून देण्यासाठी नावनोंदणी कक्ष स्थापन केला आहे. 

कोरोना विषाणुसंसर्गाच्या महामारी संकटातील लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या राज्यातील रिक्षा चालकांकरिता राज्य शासनाने राज्यातील ७ लाख पाच हजार रिक्शा चालकांसाठी १५०० रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.  यासाठी निशुल्क रिक्षाचालकांच्या नांव नोंदणीसाठी यावलचे नगरसेवक डॉ. कुंदनफेगडे यांनी यावल येथे नांव नोंदणीसाठी ऑनलाइन कक्ष उभारणी केली आहे.  या कोरोनाच्या लॉकडाऊनमूळे आर्थिक संकटात सापडलेल्या परवानाधारक सर्वसामान्य रिक्षा चालकांना १५००/- रुपये प्रमाणे सानुग्रह अनुदान रुपाने देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ  मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून देण्यासाठी   डॉ कुंदन फेगडे यांच्यातर्फे निशुल्क सेवा कक्ष दि २६ मे २०२१ पासून  सुरू करण्यात आला  आहे असून   यावल आणि  रावेर या  तालुक्यातील रिक्षाचालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगसेवक डॉ.फेगडे यांनी केले आहे.

येथे करता येईल नावनोंदणी 

यावल भुसावळ मार्गावरील भुसावळ टी पॉईन्टजवळ असलेल्या आई हॉस्पिटलच्या बाजूला  श्री कलेक्शनच्या खाली उभारण्यात आलेल्या नांव नोंदणी कक्षात तात्काळ आपल्या नांवाची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. पुढील माहीतीसाठी डॉ. कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार मो. ७६२०७२१७९९ , उज्वल कानडे मो .क्रमांक९१५८३२५१४३ आणी रितेष बारी मोबाईल क्रमांक७४९९४१९४९६ यांच्याशी संपर्क साधुन या अनुदानाविषयी अधिक माहीती जाणुन घ्यावी व आपल्या नांवाची तात्काळ नोंदणी करून घ्यावी व महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक डॉ . कुंदन फेगडे यांनी यावल आणी रावेरच्या रिक्शाचालकांसाठी केले आहे.

Protected Content