पायी जाणाऱ्याला एकाला दुचाकीची धडक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकातील दत्त मंदीराजवळून पायी जात असलेल्या मजूराला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता अज्ञात दुचाकीधारकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, ताहेर जाफर तडवी (वय-५२) रा. तांबापूरा, जळगाव हे व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी ४ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास ताहेर तडवी हे कामानिमित्त जळगाव बसस्थानक परिसरात आले होते. त्यांचे काम आटोपून ते आकाशवाणी चौकातून घरी जात होते. दरम्यान, आकाशवाणी चौकातील दत्त मंदीराजवळून पायी जात असतांना त्यांना मागून येणाऱ्या अनोळखी दुचाकीधारकाने जोरदार मागून जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. नागरीकांच्या मदतीने ताहेर तडवी याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. सोमवारी ५ डिसेंबर रोजी ताहेर तडवी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ निलेश भावसार करीत आहे.

Protected Content