पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिव कॉलनी, कृष्णापुरी येथील पाताळेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन सोहळा नुकताच उत्सहात संपन्न झाला.
पाचोरा संचलित जय श्री केसरीनंदन चॅरिटेबल ट्रस्ट व पाताळेश्वर महादेव मंदिर संस्थान, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शिव कॉलनी, कृष्णापुरी येथील ४ हजार ५०० वर्ष पुरातन पांडवांच्या हस्ते स्थापित पाताळेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार भूमिपूजन सोहळा अमळनेर येथील प. पु. श्री. सखाराम महाराज संस्थानचे गादीपती प. पु. श्री. प्रसाद महाराज यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी येथील आशीर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर यांनी सांगितले की, मंदिर परिसराजवळील पुलाचे काम लवकरच सुरू होणार आहे. याचा फायदा मंदिराला नक्कीच होणार आहे. मंदिरासाठी कुठलीही अडचण येऊ देणार नाही. तसेच प. पु. श्री. प्रसाद महाराज यांनी सांगितले की, अनेक मंदिरे बांधली जातात. परंतु, त्या मंदिराची देखभाल कोणीही करत नाही. मंदिराची देखभाल करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे जितके महत्त्वाचे मंदिर बांधणे आहे. यावेळी आशीर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर, मोहन अग्रवाल, महाविर गौड (महाराज), प्रा. सी. एन. चौधरी, अनिल (आबा) येवले, निखिल मोर, राजेश मोर, सिताराम अग्रवाल, रमेश मोर, सुरेश मोर, पुनमचंद मोर, मनोज पाटील, प्रल्हाद पांडे, सुभाष पाटील, किशोर अग्रवाल, अनुप अग्रवाल, जगदीश पटवारी, राजेश पटवारी, लक्ष्मीकांत पटवारी, पवन अग्रवाल, भरत तिवारी, संजय सावा, नितीन राठी, विकास पाटील, भरत सिनकर, नारायण पटवारी, सुभाष अग्रवाल, प्रकाश पटवारी, ओम राठी, ढोलू सिंधी, सतिष पटवारी, शोभा पाटील, दिलीप पवार, रमेश अग्रवाल, विनोद पाटील, जगदीश पाटील, सुरेश मराठे, गोवरधनदास सिंधी, सुरेश पाटील, राम केसवाणी, संतोष पाटील, अशोक पाटील, राजेंद्र पाटील, रविंद्र पाटील, योगेश पवार हे उपस्थित होते.