पाडळसे ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ७९.८३ टक्के मतदान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवारी १८ डिसेंबर रोजी शांततेत मतदान करण्यात आले. यावल तालुक्यातील पाडळसे येथील निवडणूकीसाठी एकुण ७९.८३ टक्के मतदान करण्यात आले.

यावल तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सार्वत्रीक निवडणुकीसाठी शांततेत मतदान संपन्न झाले. वार्ड क्रमांक १ मध्ये ८२० पैक्की ५९५ मतदारांनी मतदान केले. तर वार्ड क्रमांक २ मध्ये ६४५ मतदारापैक्की एकुण ५५५ मतदार, वार्ड क्रमांक ३ मध्ये ६०१ पैक्की ४९३ मतदार, वार्ड क्रमांक ४ मध्ये ८७४ मतदारा पैक्की ७२० तर वार्ड क्रमांक ५ मध्ये ९९८ पैक्की ७७४ अशा ४५४८ पैक्की ३६३२ मतदारानी सरासरी ७९.८३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यात सरपंचपदासाठी १५ उमेदवार तर ग्राम पंचायत सदस्यच्या पदासाठी एकुण ४० उमेदवारांचे राजकीय भविष्य ईव्हीएम यंत्रणेत बंद झाली आहे. मतदान करतांना काही ठीकाणी मोठया प्रमाणावर मतदारांना ईव्हीएम मशीनच्या गोंधळामुळे कसे मतदान करावे, हेच समजत नसल्याने अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली. २० डिसेंबर रोजी यावलच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रीया शांततेच्या वातावरणात पार पडली. वार्ड क्रमांक ५ मध्ये पाडसळे गावातील तरुण अमोल प्रजापती यांनी आपले लग्न लावण्याच्या आदी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

Protected Content