सट्टा जुगार प्रकरणी एकास अटक

मुक्ताईनगर प्रतिनिधी | सट्टा जुगाराचा अवैध धंदे केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून या प्रकरणी अंतुर्ली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आज सोमवार, दि.१७ नोव्हेंबर २०२२ रोजी मुक्ताईनगर येथीलअंतुर्ली दुरक्षेत्र येथे कार्यरत पोकॉ रविंद्र चौधरी यांच्या फिर्यादीनुसार त्यांना मुक्ताईनगर ईच्छापूर रोडवरील ‘शिवाय ढाब्याच्या शेडमागे सट्टा जुगाराचे अवैध धंदे सुरु असल्याची गोपणीय माहिती मिळाली.

त्यानुसार बातमीची खात्री केल्यावर संशयित आरोपी विनोद हा लोकांकडून पैसे घेऊन ‘कल्याण मटका’ नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळत व खेळवित असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ याचे मार्गदर्शन खाली पोउपनिरीक्षक श्री शेवाळे व पोलीसांनी सापळा रचत पिंप्रीभोजना शिवारातील मुक्ताईनगर ईच्छापूर रोडवरील ‘मामाश्री गोडाऊन’समोर असलेल्या ‘शिवाय ढाब्या’च्या शेडमागे छापा टाकत विनोद उर्फे अक्षय मुरलीधर देशमुख यास ताब्यात घेतले.

पोलीसांना सट्टा जुगाराचा संशय आल्याने दुपारी २ वाजेच्या सुमारास छापा टाकला त्याचेकडून रोख रक्कम आणि सट्याचे आकडे व पैसे लिहलेले स्लिपबुकाची कार्बन कॉपी एक बॉलपेन असा एकूण २,५७५ रुपयांचा दस्तावेज जप्त करण्यात आला असून या प्रकरणी अंतुर्ली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!