नागपूर, वृत्तसंस्था । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी नागपुरात दाखल होताच विमानतळावरून थेट संघाचे मुख्यालय गाठले. त्यांनी संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बंद दरवाजाआड तब्बल दीड तास चर्चा झाली. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली या भेटीचे कारण गुलदस्त्यात आहे. मात्र, नंतरच्या विमानाने आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपचं ‘मिशन महाराष्ट्र’ सुरू झालं आहे. तीन ते चार महिन्यात सरकार येईल, असा दावा केला. मुनगंटीवार यांनी दुसऱ्यांदा केलेलं हे वक्तव्य आणि भाजप नेत्यांची सरसंघचालकांशी झालेली भेट त्यामुळंच महत्त्वाची मानली जात आहे.