पहूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी छळ केल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील माहेर असलेल्या भाग्यश्री मुकेश मोरे (वय-२५) यांचा विवाह उल्हासनगर ठाणे येथील मुकेश आत्माराम मोरे यांच्यासह रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या दोन महिन्यानंतर पती मुकेश याने अपार्टमेंट मध्ये घर घेण्यासाठी माहेरुन ५ लाख रुपये आणावे यासाठी मागणी केली. परंतु विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्यामुळे पतीकडून शिवीगाळ व मारहाण सुरुवात झाली. त्यानंतर सासरे सासू, सासरे, जेठ आणि ननंद यांनी देखील पैशासाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता या लोंढारी येथे माहेरी निघून आल्या. शुक्रवार ८ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती मुकेश आत्माराम मोरे, सासरे आत्माराम उत्तम मोरे, सासू सुशिलाबाई आत्माराम मोरे, जेठ राजेश आत्माराम मोरे सर्व रा. उल्हासनगर, ठाणे, ननंद ज्योती सुशील मिस्तरी रा. उधना सुरत आणि मेघा गोकुळ मिस्त्री रा. पुणे यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहे.