जामनेर येथे ‘एक कोजागिरी माझ्या पोलिस बांधवांसाठी’ उपक्रम

जामनेर प्रतिनिधी । युथ एज्युकेशन वेलफेयर सोसायटी व युथ पोलीस यांच्यातर्फे जामनेर पोलीस स्टेशन येथे “एक कोजागिरी माझ्या पोलीस बांधवांसाठी” उपक्रम राबविण्यात आला.

कोरोना काळात आरोग्य विभागासहित पोलीस विभागाने सुद्धा रात्रनंदिवस आपले कर्तव्य निभावाले. काहि सुखरूप घरी आले तर काहींनी आपला जीव गमवला. पोलीस बांधव आपल्या संरक्षणासाठी त्याचे आयुष्य पणाला लावतात.आज बरोजगारी मुळे निराश झालेली तरुण पिढी  व्यशनांधीनता व गुन्हेगारी कडे वळली आहे त्यांना मुख्य प्रवाहात आन्याचा आव्हान समाजापुढे आहे. पोलीस बांधवा वर होणाऱ्या हल्याचा प्रमाण सध्या वाढल आहे. देशातंर्गत कायदा सुवस्थाचे जबाबदारी पोलीस बांधव पार पाडत असतांना त्यांना आपल्या कुटूंबासमवेत सनउत्सव ही साजरी करता येत नाहीत. त्यांच्या साठी एक समाजाचा घटक म्हणून आपण काय करतो? असे प्रतिपादन युथ पोलीस चे अध्यक्ष नितीन सुराणा यांनी केले.

पोलीस बांधवाच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणाच आव्हाण ह्या वेळी केले. यावेळी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उपस्थित मान्यवारांना पिण्यासाठी विशेषत गाईचे दूध वाटप करण्यात येऊन गाईच्या दुधापासून होणारे फायदे सांगून गोसंवर्धनाचा संदेश ही देण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष स्थानी जामनेर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरक्षक किरण शिंदे उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष नितीन सुराणा, युवराज तंवर, ईश्वर पाटील, राहुल चवरे, महेंद्र चवरे, दीपक कंडारे, शरद राजपूत, दीपक तायडे व जामनेर पोलीस स्टेशन चे सर्व पोलीस स्टाफ व होमगार्ड उपस्थित होते.

 

Protected Content