अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माहेरहून दुकान टाकण्यासाठी ५ लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, अमळनेर येथील माहेर असलेल्या करूणा अमुल पाटील माहेर (वय-२५) यांचा विवाह माहेश्वरी नगर, तक्षशिला अहमदाबाद येथील अमुल नथ्थू पाटील यांच्याशी रितीरिवाजानूसार झाला. पती अमुल पाटील याने माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी तगादा लावला. दरम्यान, माहेरची परिस्थिती हालाखीची असल्याने पैसे देवून शकले नाही. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती अमुल नथ्थू पाटील,सासरे नथ्थू सुकलाल पाटील, सासू सुनंदा नथ्थू पाटील, ननंद स्वाती नथ्थू पाटील, दीर राहूल नथ्थू पाटील सर्व रा. अहमदाबाद गुजरात यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल हटकर करीत आहे.