पाच लाखांचा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद!

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील तळेगाव येथून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे पाच लाख रुपये अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चार दिवसांतच तपासाचा छडा लावत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील संतोष सुधाकर राठोड या शेतकऱ्यांच्या घरी २३ जानेवारी रोजी सकाळी १२ ते सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड ५ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेले होते. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात २४ जानेवारी रोजी फिर्याद दाखल करताच ग्रामीण पोलीसांनी चार दिवसात तपास करून अशोक चुनिलाल चव्हाण (वय-३२) व संदीप उर्फ सॅन्डी भिमसिंग चव्हाण (वय-२८) दोघेही रा. कृष्णा नगर ता. चाळीसगाव या आरोपींनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ४ लाख २०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. हि कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्थानकाचे सपोनि रमेश चव्हाण, सपोनि हर्षा जाधव, पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार, पोहेकॉ युवराज नाईक, पोना नितीन आमोदकर, पोना शांताराम पवार, गोर्धन बोरसे, पोना भुपेश वंजारी व पोना प्रेमसिंग राठोड आदींनी केली आहे. याबाबत सर्व स्तरातून ग्रामीण पोलीसांचे कौतुक होत आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि हर्षा जाधव हे करीत आहेत.

Protected Content