आत्मनिर्भर भारताच्या सर्वांगीण विकासाला बूस्टर ठरणार डिजिटल बजेट – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव, प्रतिनिधी |  लोकप्रिय घोषणांच्या मोहात न पडता खऱ्या अर्थाने अर्थकारणाला चालना देणारा धाडसी अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडला असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केली.

 

आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढे सांगितले की,  उत्पादन, निर्यातीला चालना देणारा, शेतीला बळ देणारा आणि रस्ते – रेल्वे सक्षमीकरणाच्या माध्यमातून विकासचक्राला गती देणारा हा अर्थसंकल्प आहे.  कृषी क्षेत्रासाठी झिरो बजेट शेती ला प्रोत्साहन व या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांकडून हमीभावाने विक्रमी २ लाख ३७ हजार कोटींची खरेदी केली जाणार आहे, इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर, चार्जिंग स्टेशन पायाभूत सुविधांच्या विकासात मोठी गुंतवणूक.  ‘मध्यम आणि लघु उद्योगासाठी २ लाख कोटींचे अर्थसहाय्य’ बरोबरच ‘उद्योग आणि दळणवळण वाढीसाठी एक खिडकी योजना’ निश्चितच येणाऱ्या काळात मोदींजींच्या “मेक इन इंडिया”च्या संकल्पनेला बळ देईल. आयकरात कोणतीही वाढ न केल्याने सर्वसामान्य नोकरदार, करदात्यांना दिलासा मिळाला आहे. एकंदरीत यावर्षीचे बजेट आत्मनिर्भर भारताच्या सर्वांगीण विकासाला बूस्टर ठरणार डिजिटल बजेट ठरेल अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पावर दिली आहे.

Protected Content