पाच दिवसाचा आठवडा ; रावेर प्रशासनाचा कारभार चालणार रेल्वे वेळापत्रकावर ?

 

रावेर, प्रतिनिधी । राज्य सरकारने नुकताच पाच दिवसाचा आठवडा केला असून येणाऱ्या काही दिवसात यावर अंमलबजावणी होणार आहे. परंतु, याला तालुका अपवाद असणार आहे. शासन जीआर काढो की आदेश देओ रावेरचा कारभार रेल्वे वेळापत्रकावरच चालणार आहे.

भुसावळ, जळगाव, चाळीसगाव येथून शासकीय नोकरीसाठी हजारो अधिकारी कर्मचारी रावेरमध्ये येतात. यामध्ये पंचायत समिती, सार्वजनिक बांधकांम,दुय्यम निबंधक, सिटी सर्वे, कृषी विभाग,जलसंधारण, जि. प. बांधकाम, विभागासह अनेक इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी दरोरोज अप-डाउन करतात. सकाळी पेसेंजर न येतात सायंकाळी एक्सप्रेसने यात गाडी वेळीवर आली तर कार्यालयात वेळे आधीच अधिकारी कर्मचारी जागेवरुन गायब होत असल्याचे अप-डाउन करणाऱ्या एका कर्माचा-यांने सांगितले. शासन जीआर काढो की आदेश देओ आमचा कारभार रेल्वे वेळापत्रकावरच चालणार यामुळे नविन महाविकास आघाडीने काढलेल्या जीआर प्रमाणे सकाळी ९. ४५ ला कार्यालयात उपस्थित रहाणे तर सायंकाळी ६. १५ ला कार्यालय सोडता येणार आहे. यामुळे रावेर तालुक्यात या जीआरचे शासकीय कर्मचारी वाटण्याच्या अक्षता लावतील अशी चर्चा रंगली आहे.

Protected Content