चिंताजनक : औरंगाबादमध्ये २४ तासात नवे ६२ रुग्ण !

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमध्ये २४ तासात ६२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २३९ वर पोहोचला आहे.

 

याआधी शुक्रवारी शहरात ३९ नवीन रुग्ण आढळून आले होते, तसेच ७६ टेस्टचे रिपोर्ट आले निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली होती. दरम्यान शुक्रवारी आढळून आलेल्या या ३२ रुग्णांमध्ये सर्वाधिक मुकुंदवाडीमध्ये १८, नूर कॉलनीमध्ये ३, वडगावमध्ये १, आसेफीया कॉलनीमध्ये ३, भडकल गेट परिसरात १, गुलाबवाडी पदमपुरा २, सीटी चौक १, मेहमुदपुरा १ आणि भीमनगरमध्ये २ रुग्ण आढळले होते. औरंगाबादेत काल ३९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आज आणखी २३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात ६२ नवे रुग्ण औरंगाबादेत आढळले आहे. औरंगाबाद शहराचा आकडा हा २३९ वर पोहोचला आहे. औरंगाबादेत धक्कादायक पद्धतीने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

Protected Content