पाचोऱ्यात १०० टक्के कडकडीत बंद

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुधांशु त्रिवेदी, आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या आवमानाचा निषेध करण्यासाठी पाचोरा येथे बुधवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आय, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, समता परीषद, आर. पी. आय., वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, एकता अॅटो रिक्षा युनियन, भारतीय बौद्ध महासभा यासह विविध सामाजिक संघटनांनी राज्य सरकार व महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचे विरोधात घोषणाबाजी देत निषेध नोंदविला, व संपूर्ण पाचोरा शहर १०० टक्के कडकडीत बंद ठेवण्यात आला.

व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने बंदला प्रतिसाद दिला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करुन महापुरुषांचा सन्मान समिती तर्फे बंदला सुरवात करण्यात आली.

पाचोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्रित जमल्यानंतर महापुरुष सन्मान समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी काळे फित लावुन रेल्वे स्थानक रोड, सराफ बाजार, गांधी चौक, बस स्थानक रोड, जारगाव चौफुली, भडगाव रोड, महाराणा प्रताप चौकापर्यंत फिरुन व्यापारी बांधवांना आपले व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केले.

यात महापुरुष सन्मान समितीचे अध्यक्ष सुनिल पाटील, उपाध्यक्ष अनिल लोंढे, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहर अध्यक्ष अजहर खान, नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, रणजीत पाटील, हारुण देशमुख, भरत खंडेलवाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, नरेंद्रसिंह सुर्यवंशी, अरुण पाटील, पप्पु राजपुत, धर्मेंद्र चौधरी, अनिल सावंत, कैलास भगत, काॅंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, अॅड. अविनाश भालेराव, शहर अध्यक्ष अमजद पठाण, ओ. बी. सी. सेलचे इरफान मणियार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, जिजाऊ पाटील, समता परिषदेचे कन्हैया देवरे, विठ्ठल महाजन, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन जाधव, वंचित बहुजन आघाडीचे विशाल बागुल, भारतीय बौद्ध महासभेचे भावराव पवार, राजेंद्र खर्चाणे, संतोष कदम, नाना चौधरी, सुधाकर महाजन, राजेंद्र पाटील, सुनिल पाटील, एकता अॅटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ सदानशिव, पप्पु जाधव, सुनिल शिंदे, आकाश बनसोडे, किशोर नलावडे हे उपस्थित होते. या बंदला शहरातील सर्व सराफ असोसिएशन, सर्व व्यापारी असोसिएशन, सर्व किराणा दुकानदार असोसिएशन, सर्व कापड दुकानदार असोसिएशन, सर्व भाजीपाला विक्रेते, संत सेना महाराज नाभिक संघटना, सर्व शैक्षणिक संस्था, सर्व कटलरी व स्टेशनरी विक्रेते, सर्व लहान मोठे हाॅटेल व्यावसायिक, पाचोरा तालुक्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडिया व सोशल मिडियाच्या पत्रकार बंधु भगिनींनी पाचोरा शहर बंदला उत्स्फूर्त सहभाग नोंदवुन वाचाळविरांचा जाहिर निषेध केला.

तसेच संरक्षणाच्या दृष्टीकोनातून या पुकारण्यात आलेल्या बंदला कुठेही काही गालबोट लागू नये म्हणून पाचोरा पोलिस प्रशासनाने विशेष सहकार्य केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचे समारोप करतांना महापुरुष सन्मान समिती कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांनी आभार व्यक्त करत सदर घटना व वाचाळवीर यांची महापुरुषांबद्दल केलेले वक्तव्य निषेधार्थ असुन हे प्रकार लवकरात लवकर न थांबल्यास सदर बंद हा आंदोलनात निर्माण होईल असे ही शासनाला निर्दशनात आणुन दिले.

 

 

 

Protected Content