जिल्हा बँकेचा सहकार मेळावा व कार्यशाळा उत्साहात

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे सोमवारी १९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेच्या सहकार मेळावा आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन श्यामकांत सोनवणे होते. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर तथा जिल्हा बँकेच्या संचालिका जयश्री महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे संचालक रविंद्र भैय्या पाटील, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झाम्बरे, बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख, जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, एम.टी. चौधरी, विलास गावडे यांच्यासह विविध विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ उपस्थित होते.

यावेळी चेअरमन गुलाबराव देवकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, जिल्हा बँकेत काम करत असतांना विविध विकास सोसायटीत निवडून आलेल्या संचालक मंडळांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कारण नवीन निवडून आलेल्या संचालकांना कामकाजाविषयी पुर्ण माहिती नसल्याने कर्ज देतांना आणि कर्ज वसुली करतांना अनेक अडचणींना सामोर जावे लागते. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापक प्रशासनाने तालुका तालुक्यात जावून प्रत्यक्ष त्यांचे अडचणी काय आहे यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आजच्या मेळाव्यात देखील विकासोच्या चेअरमन व संचालक मंडळांना देखील मार्गदर्शन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content