पाचोरा, प्रतिनीधी | शहरातील संघवी काॅलनी भागात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ बालसंस्कार व अध्यात्मिक केंद्रात आजपासुन दत्तजयंती सप्ताहाची सूरूवात झाली आहे. सुमारे ४०० ते ४२५ महिला व पुरूष सेवेकरी गुरूचरिञ पारायणास बसले असुन परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
संपुर्ण महाराष्टात श्री स्वामी समर्थांच्या सेवा मार्गात असंख्य सेवेकरी असल्याचे दिसुन येते. या सेवामार्गातील दत्तजयंती सप्ताहाला अनन्य साधारण महत्व आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षीही शहरातील संघवी काॅलनी स्थित सेवा केंद्रात आज दत्तजयंती सप्ताहाची सुरुवात भक्तिमय वातावरणास करण्यात आली. ग्रामदेवता निमंञण, अग्नीस्थापना, मंडल स्थापना, प्रहर सेवा, स्थापित देवता हवन, नित्यस्वाहाकार या सोबतच पारायणास बसलेल्या सेवेकर्यांनी संकल्प घेऊन सामुहिक पारायण वाचण्यास आज सुरूवातकरण्यात आली. येणार्या पुढील सात दिवसांमध्ये गणेशयाग, स्वामीयाग, गिताईयाग, चंडीयाग, रूद्रयाग, बलिपुर्णाहुती, दत्तजन्म उत्सव, सत्यदत्त पुजन व महाआरती अशा आध्यात्मिक विधी घेण्यात येणार आहेत. यावर्षी दत्तजयंती सप्ताहात सुमारे ४०० ते ४५० सेवेकर्यांनी गुरूचरिञ पारायणाची सेवा सुरू केली असुन अनेक सेवेकरी आपल्या घरीही ही सेवा करित आहेत. या सप्ताह काळात दिवसा स्ञिया व राञी पुरूष सेवेकरी प्रहराची सेवा देणार आहेत. या सप्ताहात शहरासह तालुक्यातील हजारो सेवेकरी आपली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रूजु करतात. या सप्ताहासाठी सेवा केंद्रातील याज्ञिकी विभाग, आरती विभाग, मार्गदर्शन विभाग, नियोजन विभाग, नैव्यद्य विभाग, प्रश्नोत्तर विभाग यासारख्या विभागांचे सेवेकरी अहोराञ परिश्रम घेत आहे. या सप्ताहातील अध्यात्मिक विधिंचा जास्तीत जास्त सेवेकर्यांनी लाभ घ्यावा असे अहावन पाचोरा श्री स्वामी समर्थ बालसंस्कार व अध्यात्मिक सेवा केंद्राच्या सेवेकर्यांतर्फे करण्यात आले आहे.