पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील स्व. राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगांव मतदार संघाच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष संजय काकडे, तानुबाई विरजे पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती ढोले व्यासपीठावर होते. पाचोरा येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक १८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता शहरातील स्व. राजीव गांधी टाऊन हॉलमध्ये संपन्न झाली. या बैठकीच्या सुरवातीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तद्नंतर प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश संघटक डॉ. बालाजी जाधव यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, संभाजी ब्रिगेड या पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी युती केली असल्याने शिवसेने सोबत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकी संघ या सर्व स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याने सर्व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आप आपसातील मतभेद विसरून संभाजी ब्रिगेडची विचारधारा शहरात व ग्रामीण भागात पोहोचवावी. तसेच पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी घोषित करुन गावो गावी शाखा उभारण्यात याव्यात. पक्षाची ध्येयधोरणासह संघटन मजबूत करावे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सामान्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. तरच आपल्या पक्षाला निवडणुकीत यश आल्याशिवाय राहणार नाही. असे मोलाचे मार्गदर्शन सौरभ खेडेकर व डॉ. बालाजी जाधव यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांना पक्ष बांधणीसाठी येणाऱ्या अडचणी निर्माण होतात त्या समस्या ऐकुन त्या समस्यांचे निवारण केले.
या बैठकीस संभाजी ब्रिगेडचे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश तुपे, संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, मा. तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, मा. शहर अध्यक्ष गजमल पाटील, वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष अनिल मराठे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, शहर अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष गणेश शिंदे, शहर उपाध्यक्ष सचिन पाटील, प्रसारक प्रमुख नंदु शेलकर, रवि ठाकुर, अनिल भोई, विलास पाटील यांचेसह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुत्रसंचलन ए. एस. पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुकेश तुपे यांनी मानले.