Home धर्म-समाज पाचोऱ्यात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

पाचोऱ्यात विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे नुकतीच पांचाळ सुतार समाज मंडळातर्फे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मंडळाचे अध्यक्ष अॅड. महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री एम. के. पाटील, पाचोरा – भडगाव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप वाघ, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, सुमित किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष अॅड. महेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अरुण चव्हाण, सचिव वसंत हिरुळकर, खजिनदार दत्तात्रय हिरे, बी. टी. मिस्तरी, महेंद्र मिस्तरी, योगेश भोकरे, सुनिल सुतार, विकास सोनवणे, नितीन सोनवणे, आबा मिस्तरी, रघुनाथ हिरे, अरुण मिस्तरी, गजानन मिस्तरी, किशोर सुतार, माधव चव्हाण, राजु चव्हाण, जितेंद्र मिस्तरी, छोटु चव्हाण, अनिल मिस्तरी, आनंदा मिस्तरी, मनोज मिस्तरी, जनार्दन मिस्तरी यांची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार वसंत विरुळकर यांनी मानले.


Protected Content

Play sound