पाचोऱ्यात लाॅक डाऊनच्या पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

 

पाचोरा, प्रतिनिधी ।  जिह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी अभिषेक राऊत यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. यानुसार पाचोऱ्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी लॉकडाऊनला  उत्तम प्रतिसाद दिला.

जिल्हाधिकारी यांचे आदेशानूसार जिल्ह्यात वाढत असलेले कोरोना रुग्णांची संख्या पाहता दि. २८ मार्च ते ३० मार्च पर्यंत लाॅक डाऊन घेण्यात आले आहे. आज शहरात दवाखाने, मेडिकल स्टोअर्स, लॅबोरेटरी, दुध डेअरी, अशा अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहरात रस्ते निर्मणुष्य झाले होते. व्यावसायिक, भाजीपाला विक्रेते, जनरल स्टोअर्स, कटलरी स्टोअर्स, सराफ दुकाने, कापड दुकानदार यांनी आपली दुकाने सकाळ पासून बंद ठेवली होती.  २८ ते ३० मार्च पर्यंत लाॅक डाऊन असल्याने नागरिकांना दि. २७ रोजी च पुढील तीन दिवसांत लागण्याऱ्या भाजीपाला, किराणा, या सारख्या वस्तुंचा साठा करुन घेतला आहे.

 

Protected Content