पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील रोटरी क्लब ऑफ पाचोरा – भडगाव आणि संजीवनी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक डॉक्टर दिनानिमित्त’ ७ जुलै रोजी रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३४ रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले.
संजीवनी हॉस्पिटल येथे १ जुलै ‘ जागतिक डॉक्टर दिन’च्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीर आयोजनात जळगाव येथील रेड प्लस बँकेचे आणि संजीवनी हॉस्पिटलचे संचालक तथा रोटरीचे सहसचिव डॉ. पवन पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी २३ रोटरी बांधव आणि इतर ११ अशा ३४ सदस्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष रो. डॉ. अमोल जाधव, सचिव रो. डाॅ. गोरख महाजन, रो.चंद्रकांत लोढाया, रो. राजेश मोर, रो. प्रदीप पाटील, रो. रुपेश शिंदे , रो. शैलेश खंडेलवाल, रो. डॉ. बाळकृष्ण पाटील , रो. डॉ. वैभव सूर्यवंशी, रो. शिवाजी शिंदे, रो. पंकज शिंदे, ज्योती पंकज शिंदे, रो. निलेश कोटेचा, रो. डॉ. नरेश गवंदे, रो. डॉ. मुकेश तेली, रो. डॉ. ऋषिकेश चौधरी, रो.डॉ. सिद्धांत तेली, रो. डॉ. अतुल पाटील, रो. रावसाहेब बोरसे, रो. डॉ. कुणाल पाटील , रो. डॉक्टर सचिन पाटील, रो. सचिन बोरसे, रो.डॉ. निलेश पाटील यांनी कामकाज पहिले.